Chat boat
प्रति,
1) शिक्षणाधिकारी, मनपा नांदेड
2) गट शिक्षणाधिकारी,
पं. स. (सर्व) जिल्हा नांदेड
*विषय : संकलित मूल्यमापन चाचणी १ चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण...*
विद्यार्थ्यांचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती-योजना राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी ३१ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.
तरी आपणास कळविण्यात येते की, विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि. 28 नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२ ते १ या कालावधीत* देण्यात येणार आहे. तरी आपल्या अधिनस्त *शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांना* ऑनलाईन प्रशिक्षण घेणेबाबत सूचित करण्यात यावे. याबाबतची लिंक खाली दिलेली आहे. प्रशिक्षण झालेनंतर सदर शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात.
PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ असणार आहे. PAT (महाराष्ट्र) चॅटबॉट मार्गदर्शिका https://bit.ly/PATManual या लिंकवर पाहता येईल.
*यु ट्यूब लिंक* https://www.youtube.com/live/COJToQyq0cQ?si=M9Mp6jzYJ6os7spb
*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*
*शिक्षणाधिकारी* *(प्रा.)*
*जिल्हा परिषद,* *नांदेड*
Comments
Post a Comment